लॉकडाऊन : घराच्या ओढीने मजूराचा अन्नाशिवाय 135 किमी पायी प्रवास

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवस देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून, सर्व वाहतूक सेव बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घर सोडून इतर ठिकाणी काम करण्यास आलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतण्यास अडचणी येत आहे.

वाहतूक सेवा बंद असल्याने नागपूर येथील एका 26 वर्षीय मजूर चक्क 135 किमी पायी प्रवास चंद्रपूरला पोहचला आहे. विशेष म्हणजे या प्रवासात त्याच्याकडे अन्नाचा एक कण देखील नव्हता.

लॉकडाऊनमुळे अनेक गरीब नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यात मजूर म्हणून काम करणाऱ्या नरेंद्र शेळकेने या काळात चंद्रपूर येथील जांभ या आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने अखेरची पुणे ते नागपूर रेल्वे देखील पकडली. मात्र सरकारने नंतर वाहतूक सेवा बंद केल्याने तो नागपूरमध्येच अडकला.

अखेर पर्याय नसल्यामुळे नागपूर-नागभीड मार्गावरून पायी चालत आपल्या गावी पोहचण्याचा निर्णय घेतला. त्याने या काळात केवळ पाणी पिले व 2 दिवसाच्या पायी प्रवासानंतर आपल्या घरी पोहचला.

नरेंद्र पोलिसांना नागपूरपासून 135 किमी अंतरावर शिंदेवाही तहसील येथील शिवाजी चौकात पोलिसांना दिसला. कर्फ्यूचे पालन का नाही केले ? असे पोलिसांनी विचारल्यावर अखेर नरेंद्रने सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची तपासणी केल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याच्यासाठी गाडीची सोय करत त्याला शिंदेवाहीपासून 25 किमी अंतरावरील गावी सोडले. याशिवाय सावधगिरी म्हणून त्याला 14 दिवसांसाठी होम-क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment