एका व्यक्तीपासून 50 हजार जणांना होऊ शकते कोरोनाची लागण !

चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग जगातील 195 पेक्षा अधिक देशातील नागरिकांना झाला आहे. या व्हायरपासून बचावासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या व्हायरसपासून वाचण्याचा एकमेव मार्ग सोशल डिसटेंसिग पाळणे हाच आहे. कारण याची लागण झालेला एक व्यक्ती अनेकांना संक्रमित करतो. तज्ञांच्या मते कोरोनाग्रस्त एक व्यक्ती 50 हजार जणांना संक्रमित करू शकतो.

लंडनच्या इंटेसिव्ह केअर मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. ह्यू मॉन्टगोमरी यांच्यानुसार, कोरोना व्हायरस सर्वाधिक संक्रमित होणार व्हायरस आहे. या व्हायरसचा संसर्ग झालेला एक व्यक्ती हजारो जणांना संक्रमित करू शकतो. यापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंगिस एकमेव पर्याय आहे.

डॉ. ह्यू यांच्यानुसार, सामान्य फ्लू झाल्यास सरासरी 1.3 ते 1.4 लोक संक्रमित होऊ शकतात. ही संक्रमित व्यक्ती पुढे देखील इतरांना संक्रमित करते व हे चक्र पुढे 10 वेळा सुरू असते. या प्रकारे संक्रमित व्यक्ती 14 जणांना बाधित करते.

डॉ. ह्यु यांच्यानुसार, एक कोरोनाग्रस्त 3 जणांना संक्रमित करू शकतो. ते 3 जण प्रत्येकी 3 जणांना संक्रमित करू शकतात. असाच हा आकडा वाढून 50 हजारांपर्यंत जाऊ शकतो. मात्र संक्रमित होणाऱ्यांपैकी खूप कमी जण आजारी पडतील व खूप कमी लोकांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज पडेल.

Leave a Comment