कोरोनाचा राज्यात पाचवा बळी


मुंबई : कोरोनामुळे मुंबईतील आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला कोरोनामुळे हा राज्यातील पाचवा बळी ठरला आहे.

राज्याला कोरोनाचा बसत असलेला हा विळखा पाहता ही चिंताजनक बाब ठरत आहे. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून आता १४वर देशातील कोरोना बळींची संख्या पोहोचली आहे. प्रशासनाने लॉकडाऊन करुनही मुंबईकरांचा वावर, मंडईतील गर्दी काही केल्या कमी होत नसल्यामुळे मुंबईकरांना आता तरी परिस्थितीचे गांभीर्य समजते का हाच प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना विषाणूचा राज्यात प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण, नागरिकांनी त्याचे स्वयंशिस्तीने पालन करणे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही. परिणामी मुंबईत कोरोना फोफावताना दिसत आहे.

Leave a Comment