कोरोनामुळे सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोजचा मृत्यू


मुंबई : कोरोना व्हायरस आता हळूहळू संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेत असून भारतीय वंशाचे सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा या धोकादायक व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आहे. फ्लॉएड कार्डोज हे 59 वर्षाचे होते. 19 मार्चला न्यूजर्सीमध्ये राहणारे कार्डोज यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. विशेष म्हणजे याच महिन्यात फ्लॉएड कार्डोज मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत एक पार्टी देखील दिली होती. त्यांनी पार्टीला अनेकांना निमंत्रित केले होते. आता कार्डोज यांनी दिलेल्या पार्टीला गेलेल्या प्रत्येकांच्या चिंता वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्कमध्ये फ्लॉएड कार्डोड यांचे शेज फ्लॉएड, बॉम्बे कँटीन आणि ओ पेड्रो नामक रेस्तराँ आहेत. फ्लॉएड यांचे मुंबईसह गोव्यातही रेस्तराँ आहेत. काही दिवसांपूर्वी फ्लॉएड मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत एक पार्टीही दिली होती. त्यात जवळपास 200 जण सहभागी झाले होते. न्यूजर्सीला परत गेल्यानंतर फ्लॉएड यांना व्हायरल फीवर झाला होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. नंतर टेस्टिंगमध्ये त्यांना कोरोना व्हायरस झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.

Leave a Comment