लॉकडाऊन : 21 दिवस करा ही कामे, वेळेचा होईल सकारात्मक उपयोग

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशामुळे नागरिक 21 दिवस घरात कैद झाले आहेत. त्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवू शकतात. मात्र काहीजणांना घरात बसून बसून कंटाळा देखील येऊ शकतो. मात्र तुम्ही यावेळेचा सकारात्मक वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला 21 दिवसांसाठी अशी वेगवेगळी काम सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमच्या वेळेचा वापर सकारात्मक कामासाठी होईल.

पहिला दिवस – जर घरातील सामान व्यवस्थित ठेवलेले नसेल, तर ते व्यवस्थित ठेवा. महत्त्वाच्या फाईल्स, बँकचे पासबुक, बिल, कागदपत्र व्यवस्थित लावून ठेवा.

दुसरा दिवस – जर तुमच्याकडे कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असेल व त्यातील फोटो, व्हिडीओ, फोल्डर अस्तव्यस्त असतील, तर त्याची व्यवस्थित मांडणी करा.

तिसरा दिवस – घरातील सर्व सदस्यांसाठी जेवण बनवा. काहीतर नवीन बनवण्यास शिका.

चौथा दिवस – आपल्या आवडीची गाणी ऐका. चित्रपट बघा व मजेत आराम करा.

पाचवा दिवस – तुमच्या जवळच्या नातेवाईकांची यादी बनवा. सर्वांना एक-एक करून फोन करा व त्यांच्याबाबत विचारपूस करा.

सहावा दिवस – आपल्या मुलांना ज्या गोष्टी येत नाही ते शिकवा. जसे की, चित्र काढणे, पेंटिंग, एखादी कथा ऐकवा, तुमचे लहानपणीचे अनुभव सांगा, यामुळे तुमचा वेळ मजेत जाईल.

सातवा दिवस – तुम्ही दिवसभर योग व ध्यान करू शकता. स्वतःला शांत करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी हे करू शकता.

आठवा दिवस – आपल्या भविष्याची योजना बनवा. याशिवाय 21 दिवसांसाठी घरातील महत्त्वपुर्ण वस्तू, जसे की राशन, पाणी, बँक बँलेस या गोष्टी पहा. नसतील तर त्या पुर्ण करा.

नववा दिवस – तुमच्या आवडीचे पुस्तक वाचा. पुस्तक घरात नसेल, तर ऑनलाईन देखील तुम्ही वाचू शकता.

दहावा दिवस – तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात, त्या क्षेत्रातील ज्ञान वाढवा. स्वतःला अधिक कार्यक्षम बनवा.

अकरावा दिवस – इंटरनेटवर सर्च करून महत्त्वाची माहिती जमा करा. आरोग्य, इतिहास, विज्ञान इत्यादी संबंधी जाणून घ्या.

बारावा दिवस –  तुम्ही घराची साफ-सफाई करू शकता.

तेरावा दिवस – तुमच्याकडे काही महत्त्वाच्या गोष्टी नसतील, तर त्याची यादी बनवा. संकटाच्या काळात उपयोगी असणाऱ्या वस्तू जमा करा.

चौदावा दिवस –  घरात एखादी बिघडलेली वस्तू असेल, तर शक्य असल्यास ती दुरूस्त करू शकते. शक्य असल्यास कपडे शिवू शकता.

पंधरावा दिवस – तुम्ही घर उत्तमरित्या सजवू शकता. घरातील सोफा, बेड, फ्रीज, कपाट इत्यादींची जागा बदलून नवे बदल करू शकता.

सोळावा दिवस – घरात गार्डन असेल तर गार्डनिंग करू शकता. घरातील गॅलरीमध्ये ठेवलेल्या भांडी असतील तर ती स्वच्छ करू शकता. झाडांच्या आजुबाजूची माती खोदून त्याला सुपीक बनवू शकता.

सतरावा दिवस – एक दिवस समाजकार्यासाठी द्या. सोसायटीचे अध्यक्ष आणि प्रशासनाच्या लोकांची संपर्क करून गरजूंची मदत करा.

अठरावा दिवस –  टिव्ही, गेम, इंटरनेट सर्व बंद करून, घरच्यांसोबत अंताक्षरी खेळा, कॅरम, बुद्धीबळ खेळू शकता.

एकोणिसावा दिवस – तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत काहीच लिहिले नसेल, तर ही उत्तम वेळ आहे. तुमचे आतापर्यंतचे आयुष्य कसे होते, हे लिहिण्यासाठी एक डायरी करा.

विसावा दिवस – लिहिण्याची आवड असेल तर कविता, कथा लिहा.

एकवीसवा दिवस – तुम्ही केलेल्या कार्यांची यादी बनवा. एवढ्या दिवसांमध्ये काही राहिले असेल तर त्याचे नियोजन करा व पुढील भविष्याचा विचार करा.

तुम्ही या कामांमध्ये तुमच्या पद्धतीने, सोयीनुसार बदल करू शकता. काही नवीन गोष्टी करून तुमचा वेळ सकारात्मक कामासाठी वापरू शकता.

Leave a Comment