सौरव गांगुली ५० लाखांचा तांदूळ दान करणार


फोटो सौजन्य पत्रिका
पंतप्रधान मोदी यांनी देशात कोविड १९ प्रतिबंधाचा एक उपाय म्हणून २१ दिवसांचा लॉक डाऊन केल्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी टीम इंडियाचा माजी कप्तान आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली पुढे सरसावला आहे. त्याने लॉक डाऊन मुळे ज्या लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवले गेले आहे, त्या गरजवंत लोकासाठी ५० लाख रुपये किमतीचा तांदूळ मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनने या संदर्भात काल घोषणा केली आहे. सौरव लाल बाबा कंपनीकडून ही तांदूळ खरेदी करणार आहे. लाल बाबा कंपनीने या संदर्भात सौरवचा आदर्श ठेऊन अन्य नागरिकही गरजवन्तांच्या मदतीसाठी पुढे येतील अशी आशा व्यक्त केली आहे. यातून बाकीच्यांना प्रेरणा मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने यापूर्वीच बंगाल सरकारला ३० लाख रुपयांची मदत दिली असून त्यातील पाच लाख रुपये असो.चे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी दिले आहेत. हे पैसे बंगाल सरकारच्या आणीबाणी रिलीफ फंडात जमा केले गेल्याचे समजते.

Leave a Comment