अजूनही अनेक देशात सर्रास सुरु आहेत वेट मार्केट्स


फोटो सौजन्य द हिल
चीनच्या वुहान मधील ज्या वेट मार्केट मधून कोविड १९ चा प्रसार झाला असे मानले जात आहे तशी वेट मार्केट, करोनाने जगभर थैमान घालूनही अनेक देशात आजही सर्रास सुरु असल्याचे दिसून आले आहे. वेट मार्केट म्हणजे या ठिकाणी वन्य प्राणी मारून विकले जातात. त्यामुळे तेथे प्राणांचे रक्त, मूत्र, लाळ, विष्ठा एकत्र मिसळली जाते आणि त्यातूनच घातक विषाणूंचा फैलाव होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार अजूनही अनेक देशात हे बाजार सुरु आहेत. त्यात व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, हॉंगकॉंग, सिंगापूर, द. कोरिया, जपान आणि चीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. चीनच्या गुआंगडोंग मार्केट मध्ये अजगर, जंगली मांजरे, कासवे, खारी, उंदीर, चित्त्याची पिले, वटवाघळे, पेंगोलीन म्हणजे खवले मांजरे, लांडग्याची पिले, मगरी यांचा बाजार आहे.

१९८० मध्ये आलेला एड्स,२००२ मध्ये आलेला सार्स, २०१२ मध्ये आलेला मर्स, स्वाईन फ्लू या सारखे आजार अश्याच मार्केट मधून जगभर फैलावले आहेत. आताचा कोविड १९ याच प्रकारे फैलावला आहे तरीही हे बाजार सुरु आहेत यामागे एक कारण सांगितले जाते. मर्स सौदी मधून उंटांच्या मांस आणि दुधातून फैलावला होता. या बाजाराच्या नाड्या क्रिमिनल, स्मगलर लोकांच्या हाती आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे अवघड होते. शस्त्रे, ड्रग प्रमाणे वन्य जीव तस्करी हा फायदेशीर उद्योग आहे आणि त्यातून हे बाजार चालतात.

Leave a Comment