देशाला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान हे दरवेळेस रात्री 8 वाजताचा वेळ का देतात ?


कोरोनाचे देशातील रुग्ण दिवसोंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक ऐतिहासिक घोषणा करत संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाउन राहिल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर या घोषणेनंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘पंतप्रधान हे नेहमी देशाला संबोधित करण्यासाठी रात्री वाजताचाच वेळ का देतात, अशी तक्रार त्याने केली आहे. जर पंतप्रधान रात्री 8 ऐवजी सकाळी 8 वाजता बोलले असते तर निदान देशातील नागरिकांना तयारी करायला वेळ मिळाला असता, असे मत मांडले.

त्याचबरोबर पंतप्रधान रात्री आठ ऐवजी सकाळी आठ वाजता बोलले असते तरी बरे झाले असते. संध्याकाळी चार वाजता घोषणा केली असती तरी व्यवस्था करुन ठेवली असती. नेहमी रात्री आठ वाजताच बोलतात आणि तयारीसाठी चार तासांचा अवधी देतात, असे अनुरागने ट्विट केले आहे. दरम्यान, बस किंवा ट्रेन नाही म्हणून जे चालत घरी जाण्यासाठी निघाले असतील त्यांचे काय? आता काय बोलावे? ठीक आहे प्रभू!’, असे ट्विट अनुरागने केले आहे.

Leave a Comment