संशोधन : शौचालयानंतर हात न धुवणारे स्वतः देतात कोरोनाला आमंत्रण

कोरोना व्हायरसबाबत जगभरात संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. ब्रिटनमधील यूनिवर्सिटी ऑफ बरमिंघमच्या संशोधकांनुसार, ज्या देशातील नागरिकांना हात धुण्याची सवय नसते, ते स्वतःच कोरोना व्हायरसच्या संपर्कात येतात.

संशोधकांनी जी प्रोग्रेबना यांनी सांगितले की, कोव्हिड 19 पासून वाचण्यासाठी वारंवार 20 सेंकद साबणाने हात धुण्यास सांगितले जाते. वैयक्तिक स्वच्छता सवय बदलणे शक्य आहे. मात्र विशेष देश आणि जागतिक स्तरावर हात धुण्याची सवय बदलणे कठिण काम आहे.

संशोधनात समोर आले की, चीनमध्ये 77 टक्के, जपान 70 टक्के, दक्षिण कोरिया 61 टक्के, नेदरलँड 50 टक्के आणि भारतात 40 टक्के लोक शौचालयानंतर हात धुवत नाही.  ब्रिटन आणि अमेरिकेत हा आकडा क्रमशः 25 व 23 टक्के आहे.

संशोधकांनी या अभ्यासासाठी 64,002 लोकांच्या डाटाबेसचा अभ्यास केला. संशोधनात समोर आले की, शौचालयानंतर हात धुण्याच्या बाबतीत सौदी अरेबियाच्या लोकांना सर्वात चांगली सवय आहे. येथे केवळ 3 टक्के लोक शौचालयानंतर हात धुवत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment