भारतात 562 कोरोना बाधित, तर 11 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांच्या भारतामधील संख्येत वाढ झाली असून 562 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या व्हायरसमुळे आतापर्यंत 11 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तमिळनाडूतील मदुरईमध्ये आज एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईमध्ये एका व्यक्तीचा तर दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला आहे. एकूण 562 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 476 भारतीय नागरिक आहेत, तर 43 विदेशी नागरिक आहेत.

मंगळवारी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी त्यावेळी बोलताना 21 दिवसांसाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, देशासमोर कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. या महारोगाचा संसर्ग एवढ्या झपाट्याने होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नसल्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांनी मोलाचे सहकार्य केले. देशात जेव्हा संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Comment