कोरोना : वयोवृद्धांना आणि आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांना हा तरुण देत आहे मोफत पिझ्झा

कोरोना व्हायरसच्या महामारीने जगाला ग्रासल्याने अनेक शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृद्धांचे खाणे-पिण्याचे हाल होताना दिसत आहेत.

अशा लोकांची मदत करण्यासाठी हंगेरीतील बुधापेस्ट येथील 20 वर्षीय मिलन वार्गा पुढे आला आहे. घरात स्वतःला आयसोलेट करून घेतलेल्या वृद्धांना मोफत पिझ्झा पोहचवत आहे.

मिलनने काही दिवसांपुर्वीच 3 वर्षांपासून बचत केलेल्या पैशांपासून स्वतःचे छोटेसे पिझ्झाचे दुकान सुरू केले आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्याच्या दुकानात ग्राहकच आले नाहीत. त्यामुळे त्याच्या दुकानात अनेक वस्तूंचा साठा निर्माण झाला होता, म्हणून अखेर त्याने आयसोलेट असणाऱ्या वृद्धांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

मिलन म्हणाला की, जरी मी पिझ्झा विकू शकत नसलो, तरी जे क्वारंटाईनमध्ये आहेत अशांची मदत तरी करू शकतो.

केवळ मिलनच नाहीतर अनेकजण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. फेसबुक ग्रुप बुधापेस्ट एअरबीएनबी कम्युनिटी फॉर द हेल्थ वर्कर्स जे आरोग्य कर्मचाऱ्यां कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेऊ इच्छित आहेत, त्यांना राहण्यासाठी घर देत आहेत. आतापर्यंत 43 कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे मदत करण्यात आली आहे. हंगेरीमधील एक हॉटेल परदेशातून हंगेरीला परतलेल्या नागरिकांना सेल्फ-क्वारंटाईनसाठी रूम्स देत आहे.

Dear people of Darjeeling, our bakery is opened today with a fresh batch with our regular time 6 am and we will close…

Posted by Glenary's on Sunday, March 22, 2020

केवळ हंगेरीच नाहीतर दार्जिलिंगमधील ग्लेनरीझ बेकरी देखील नागरिकांना मोफत जेवण देत आहे. याशिवाय त रोजंदारीवर काम करणाऱ्यांना दररोज मोफत ब्रेड देणार असल्याचे देकील त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले.

Leave a Comment