मागील काही दिवसांमध्ये तुम्ही कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुवायला हवे, असे शेकडो वेळा ऐकले असेल. साबण आणि पाण्याद्वारे 20 सेकंद हात धुवावे असे सांगितले जाते. मात्र हात धुतल्यानंतर जंतू खरचं नष्ट झाले केले की नाही, हे तुम्हाला स्वतः पाहायला मिळाले तर ?
व्हिडीओ : हातांद्वारे कसा पसरतो व्हायरस ?
हे जंतू तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. या संदर्भातील नासाच्या माजी इंजिनिअरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इंजिनिअर मार्क रॉबर एक व्हिडीओ ज्यात जंतू आणि त्याचा प्रसार ग्लो जर्म पाउडरच्या मदतीने पाहता येते. ही पावडर यूव्ही लाईटमध्ये फ्लोरेसेंटमध्ये बदलते.
व्हिडीओमध्ये दिसते की, आधा रॉबर एका शिक्षिके व काही विद्यार्थ्यांना पॉवडर वापरून संक्रमित करतो. त्यानंतर तो यूव्ही लाईटवापरून त्याचा प्रसार दिवसभरात कोठे झाला आहे, हे पाहतो.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, जंतू फोन, डेस्क आणि चेहऱ्यावर त्वरित पसरतो. याशिवाय 8 सेकंद हात धुवणे का गरजेचे आहे, हे देखील तो सांगतो.