कोरोना : फ्लिपकार्टची सेवा तात्पुरती बंद

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने आपली सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टच्या साइटवर गेल्यावर मेसेज लिहून येत आहे. यामध्ये लिहिण्यात आले आहे की, आम्ही आमची सेवा तात्पुरती बंद करत आहोत. मात्र आमचा प्रयत्न लवकर परत येण्याचा असेल.

फ्लिपकार्टने लिहिले की, ही खूपच अवघड वेळ आहे. याआधी असे कधीच झाले नाही. आमची तुम्हाला विनंती आहे की घरात रहा व सुरक्षित रहा. आम्ही लवकरच परत येऊ.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा केली आहे. मात्र याकाळात अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी सुरू राहतील.

Leave a Comment