… म्हणून कोरोनाची लस लवकर बनण्याची शक्यता

जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरातील 18 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसच्या जेनेटिक कोडवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, हा व्हायरस आपले रूप बदल नाही. जी एक चांगली गोष्ट असून, यामुळे दीर्घकाळ टिकणारी लस बनवता येईल.

सर्व व्हायरस वेळेनुसार विकसित होतात. ते एका होस्ट सेलच्या आत राहून स्वतःचा आकार वाढवतात व त्यानंतर लोकसंख्येद्वारे आजुबाजूला पसरतात. या दरम्यान काही व्हायरस आपल्या नैसर्गिक रुपातच राहतात तर काही स्वतःचे स्वरूप बदलतात. मात्र कोरोना व्हायरस स्वतःचे रुप बदलत नाही. हा प्रत्येक ठिकाणी एकसारखाच आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, एक व्हायरस दुसऱ्यापेक्षा अधिक धोकादायक असल्याचा कोणताच पुरावा नाही.

वैज्ञानिक आता व्हायरसच्या 1000 विविध नमून्यांवर अभ्यास करत आहे. जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीमध्ये मॉल्यूकल जेनेटिस्ट पीटर थीलन व्हायरसचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यानुसार, अमेरिकेतील संसर्ग झालेल्या लोकांमध्ये आणि वुहानमध्ये पसरणाऱ्या मूळ व्हायरसमध्ये केवळ 4 ते 10 आनुवंशिक अंतर आहे.

थीलन यांच्यानुसार, मोठ्या संख्येत लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला असला तरी आनुंवशिक अंतर कमी आहे. त्यामुळे सार्स कोव्ह-2 व्हायरससाठी एकच लस बनवावी लागू शकते. कारण फ्लूसाठी दरवर्षी नवीन लस तयार करावी लागते.

Leave a Comment