सोशल डिसटेंसिगद्वारे कोरोनावर 62 टक्के नियंत्रण मिळवणे शक्य

सामाजिक अंतर अर्थात सोशल डिसटेंसिगद्वारे कोरोना व्हायरसवर 62 टक्के नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे भारतीय आरोग्य संशोधन परिषदने (आयसीएमआर) म्हटले आहे. लॉकडाऊन आणि लोक घरात असल्याचा देखील यामुळे फायदा होऊ शकतो व काही आठवड्यातच 90 टक्क्यांपर्यंत व्हायरसवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

आयसीएमआरचे डॉक्टर रमन गंगखेडकर म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीने भितीमध्ये हायड्रोक्लोरोक्वीन औषध घेऊन नये. हे 15 पेक्षा कमी आणि 60 पेक्षा अधिक वयांच्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. या औषधावर संशोधन चालू असून, सध्या केवल आरोग्य कर्मचारी आणि उपचारनंतर संक्रमित व्यक्तीला हे औषध दिले जात आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 500च्या पुढे गेला आहे. संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये हॉस्पिटल उभारण्याचे काम देखील सुरू आहे. तसेच, केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोरोनाग्रस्तांचा उपचार केला जाणार आहे.

Leave a Comment