कर्फ्यूमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा

महामारी घोषित करणाऱ्या आलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात 18 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

याआधी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू देखील पाळवण्यात आला होता. मात्र कर्फ्यू असतानाही अनेकजण कोरोना व्हायरसला गांभीर्याने ने घेता रस्त्यावर विना कारण फेरफटका मारताना दिसले.

लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगली अद्दल घडवली व शिक्षा दिली. पोलिसांनी शिक्षा दिलेले असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना चक्क ‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी राहणार नाही’, अशा आशयाचे पोस्टर दिले.

याशिवाय अनेक ठिकाणी कर्फ्यूमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद मिळाला तर काहींना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.

Leave a Comment