अशी झाली ऑलिम्पिकची सुरूवात, 2016 साली या व्हायरसचे होते संकट

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभुमीवर जगभरातील मोठमोठ्या क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आता टोकिया ऑलिम्पिक देखील या वर्षीसाठी रद्द करण्यात आली असून, ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी करण्यात येणार आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी चर्चाकरून ऑलिम्पिक पुढील वर्षीपर्यंत टाळण्यास सांगितले आहे. 23 जुलै 2020 ला सुरू होणारे ऑलिम्पिक आता 2021 साली होणार आहे.

Image Credited – Forbes

टोकियो ऑलिम्पिकप्रमाणेच 2016 मध्ये रियो ऑलिम्पिकला देखील झिका व्हायरसचा धोका होता. 2009 साली रियो ऑलिम्पिकसाठी ब्राझीलला परवानगी मिळाली होती. मात्र आर्थिक मंदी, बेरोजगारी, मच्छरांमुळे होणारा झिका व्हायरस, राजकीय संकट व पायाभूत सुविधा नसणे, अशा गोष्टींचा रियो ऑलिम्पिकला सामना करावा लागला होता. याच काळात राष्ट्रपती दिल्मा रुसेफ यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव चालविण्यात आला होता.

झिका व्हायरसमुळे रियो ऑलिम्पिक देखील रद्द होणार असे वाटत होते. मात्र या सर्वांवर मात करत 5 ते 21 ऑगस्ट 2016 पर्यंत या ऑलिम्पिकचे शानदार आयोजन करण्यात आले.

ऑलिम्पिकचे पहिले अधिकृत आयोजन ईसा पुर्व 776 मध्ये झाले होते. प्राचीन काळात शांतीच्या वेळी योद्ध्यांमध्ये ही स्पर्धा होत असे. शर्यती, बॉक्सिंग, कुस्ती आणि रथांची शर्यत यावेळी पार पडत असे. मात्र रोमचा सम्राट थियोडोसिसने याला मुर्ती पुजेचा उत्सव ठरवत यावर बंदी घातली.

Image Credited – Amarujala

आधुनिक ऑलिम्पिकची सुरूवात सर्वात प्रथम 1896 मध्ये ग्रीसची राजधानी एथेंसमध्ये झाली. या स्पर्धेत 14 देशांमधील 241 खेळाडूंनी भाग घेतला होता. 9 खेळांचे 43 इव्हेंट या ऑलिम्पिकमध्ये झाले होते. 43 स्पर्धकांमध्ये पहिल्यांदाच मॅरोथॉनचे देखील आयोजन करण्यात आले होते. प्रमुख स्पर्धांमध्ये टेनिस, ट्रॅक अँड फील्ड, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, कुस्ती, तिरंदाजी आणि जिम्नॅस्टिकचा समावेश होता. क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये भाग घेणारे संघच कमी असल्याने हे खेळ रद्द करण्यात आल्या आहेत.

1896 मध्ये एथेंसपासून सुरू झालेले ऑलिम्पिक आतापर्यंत 30 वेळा भरवण्यात आलेले आहे. मात्र या काळात तयारी पुर्ण होऊन देखील 3 वेळा ऑलिम्पिक रद्द करण्यात आले होते. यात प्रथम विश्वयुद्धामुळे बर्लिन ऑलिम्पिक (1916), टोकियो ऑलिम्पिक (1940) आणि लंडन ऑलिम्पिकचा (1944) समावेश आहे.

Leave a Comment