बॉलिवुडकरांचे चाहत्यांना 21 दिवस घरातच राहण्याचे आवाहन

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही दिवस सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. या भयानक स्थितीत प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत करत आहे.

सरकारकडून देखील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता बॉलिवुडच्या कलाकारंनी देखील आपल्या चाहत्यांना हे 21 दिवस बाहेर न पडता, घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत 21 दिवस संकल्प करत कोरोनाला दफन करण्याचे आवाहन केले.

गायिका आशा भोसले यांनी ट्विट करत नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.

अभिनेता अनिल कपूर यांनी नागरिकांना लॉकडाऊनला सपोर्ट करण्याचे आवाहन केले.

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडप्याने व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सरकारच्या नियमांचे पालन करण्याची विनंती केली.

अभिनेत्री तापसी पन्नू –

शाहिद कपूरने देखील नागरिकांना घरी रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन केले.

ऋषी कपूर –

अभिनेत्री कंगणा रणावतची बहिण रंगोलीने देखील 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनला पाठिंबा दर्शवला.

https://twitter.com/Rangoli_A/status/1242468252506193928

याशिवाय तमन्ना भाटिया, हुमा कुरेशी, रितेश देशमुख, नेहा धुपिया, श्रेया घोषाल या अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, 21 दिवस संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असला तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सरकारतर्फे केले जात आहे.

Leave a Comment