लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी मजूरांचा 36 तास आणि 80 किमी पायी प्रवास

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 21 दिवस देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडन सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत घर सोडून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी आलेल्या नागरिक घाबरलेले दिसत आहेत व आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्व वाहने बंद असल्याने नागरिकांना घरी परतण्यास अडचणी येत आहेत.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर उत्तर प्रदेशमधील वाहतूक सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र या चिंताजनक आणि भयभीत स्थितीत पोलिसांचा सामना करत 20 वर्षीय अवधेश कुमार पायी आपल्या घरी निघाला आहे.

अवधेश हा उन्नाव येथील फॅक्ट्रीमध्ये काम करतो. आता तो आपल्या कमीत कमी 20 सहकार्यांबरोबर  उन्नाववरून आपल्या बाराबंक्की गावी हा 80 किमीचा प्रवास पायी पुर्ण करत आहे. अवधेशने मंगळवारी सहकार्यांवर हा प्रवास सुरू केला असून, तो 36 तासांच्या पायी प्रवासानंतर गुरूवारी आपल्या घरी पोहचेल. या प्रवासातही त्यांना पोलिसांनी अडवण्याची भिती आहे.

अवधेश याविषयी म्हणाला की, मला हे करायचे नाही. मात्र माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. जेथे काम करायचो त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला जागा खाली करण्यास सांगितले. त्यामुळे आम्हाला घरी जाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने, आम्ही सर्वांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला.

हा ग्रुप आपल्यासोबत कपड्यांची बॅग, पाणी आणि काही बिस्किट घेऊन भर उन्हात प्रवास करत आहे. सोबतच उन्हापासून चेहरा झाकण्यासाठी तोंडाला टॉवेल गुंडाळला आहे.

Leave a Comment