पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने जिंकली कोरोनाविरोधातील लढाई


पुणे – पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक दिलासादायक माहिती दिली असून महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सांगितले.

9 मार्च रोजी महाराष्ट्रात पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोघे रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत 1 मार्चला दुबईवरुन आले होते. त्यांना 6 मार्चपर्यंत कोणतेही लक्षणे दिसली नाहीत. मात्र 9 मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते. दरम्यान, या दाम्पत्यावर 13 ते 14 दिवस उपचार केल्यानंतर आज अखेर या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे समोर आले आहे. या दोघी रुग्णांच्या रक्त तपासणीत कोरोना निगेटीव्ह असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment