जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश; पुण्यातील पेट्रोल-डिझेल विक्री बंद


पुणे – राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली असून सर्व सरकारी वाहतूक व्यवस्था बंद केल्या असूनही लोक आता खजगी वाहने घेऊन बाहेर पडत असल्यामुळे आता इंधन विक्रीवर बंधने आणण्याचा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आहे.

जिल्हा पेट्रोल डिझेल पम्प असोसिएशनला पत्र लिहून जिल्हाधिकारी राम यांनी हा निर्णय कळवला आहे. त्यांनी यात साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ च्या खंड २,३,४,चा दाखल देत पंप चालकांना आदेश दिला आहे. वगळण्यात आलेल्या वाहनांना सोडून इतर कोणालाही इंधन विक्री करू नये असं आदेश आहे.

या नियमातून यांना वगळण्यात आले आहे –
१) अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी.
२) कोरोना नियंत्रण आणि निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती.
३) अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खजगी व्यक्ती.
४) वैद्यकीय उपचार कीवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती.

१ ते ४ वगळण्यात आलेल्या व्यक्तींनी एकाच वेळी टाकी संपूर्ण भरून घ्यावी अशीही सूचना करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्ह्यातील वरील १ ते ४ व्यक्तींची यादी बनवून ती पेट्रोल डिझेल पम्प व्यावसायिकांना द्याव असे आदेश दिले आहेत.

Leave a Comment