कोरोना : पुण्यातील या लॅबला मिळाली चाचणी किटच्या व्यावसायिक उत्पादनाची परवानगी

पुण्यातील मायलॅब डिस्कवरी सोल्यूशंस कंपनीला कोव्हिड-19 च्या टेस्ट किटचे व्यावसायिक उत्पादनसाठी परवानगी मिळाली आहे. किटचे उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळालेली ही देशातील पहिली कंपनी आहे.

कंपनीने सांगितले की, कोरोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या ‘मायलॅब पॅथोडिडेक्ट कोव्हिड-19 क्वॉलिटेटिव्ह पीसीआर किटला’ केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेद्वारे (सीडीएससीओ) परवानगी मिळाली आहे. कंपनीने दावा केला आहे की एका किटद्वारे 100 लोकांची तपासणी करता येईल.

हे किट बाजारात आल्यानंतर खाजगी लॅबमध्ये कोरोनाचे दिवसाला 1 हजार चाचण्या करता येतील. एका लॅबमध्ये सरासरी 100 नमून्यांची तपासणी करता येईल.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले की, स्थानिक आणि केंद्र सरकारच्या मदतीने मेक इन इंडियांतर्गत कोव्हिड-19 ची तपासणी करणारे किट तयार केले आहे. याला जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोलच्या दिशानिर्देशद्वारे बनविण्यात आलेले आहे.

मायलॅब सध्या ब्लड बँक, हॉस्टिपलसाठी एचआयव्ही तपासणी किट बनवते. या किटद्वारे तपासणीचे परिणाम एकदम अचूक येतील, असा दावा कंपनीने केला आहे. सध्या सरकारने जर्मनीवरून लाखो तपासणी किट आयात केले आहे. मायलॅबने दावा केला आहे की, येणाऱ्या काळात एका आठवड्यात एक लाख किट बनवले जातील.

Leave a Comment