मोदींचे देशवासियांना आवाहन; करा डिजिटल पेमेंटचा वापर


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोख व्यवहार करण्याऐवजी डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करण्याचे आवाहन यांनी केले आहे. साथीच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर करणे सुरक्षित असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
साथीच्या काळात चलनी नोटांचा आर्थिक व्यवहारांसाठी वापर करणे धोकादायक असून व्हायरसचा नोटांसोबत प्रसार होण्याचा फार मोठा धोका आहे. या गोष्टीकडे जाणकारांनी याआधीच लक्ष वेधले आहे. अद्यापही भारतात बहुतांश व्यवहार रोखीनेच होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू श्रीकांत कदंबी, क्रिकेटपटू स्मृती मंदाना, सिक्वाया इंडियाचे रंजन आनंदन आणि आरिन कॅपिटलचे चेअरमन मोहनदास पै यांनी या पार्श्वभूमीवर लोकांना ई-पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी ट्विट केले आहे. मोदींनी म्हटले की, सामाजिक दूरता पाळणे ही आजच्या काळाची गरज आहे. डिजिटल पेमेंट्स त्यासाठी तुम्हाला मदत करील. या चार मोठ्या लोकांचे ऐका आणि डिजिटल पेमेंटचा वापर करा.

दरम्यान, वित्त मंत्रालय आणि बँका यांनीही डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन स्वतंत्रपणे केले आहे. वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करून लोकांना आवाहन केले की, जर तुम्हाला पेमेंट्स करायचे असेल, तर ते डिजिटल माध्यमातून करा आणि सुरक्षित राहा.

Leave a Comment