या भारतीय महिला वैमानिकाने केले इटलीतील भारतीयांचे एअरलिफ्ट

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत आहे. भारतात देखील अनेक शहर लॉक डाउन करण्यात आली असून, लोक घरात कैद आहेत. मात्र अनेक भारतीय या काळात परदेशात अडकले आहेत. या संकटाच्या काळात अशा नागरिकांना परत आणण्याचे काम एअर इंडियाची पायलट टीम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अशा पायलट्सचे कौतूक केले आहे.

याच टीममध्ये असलेल्या कॅप्टन स्वाती रावल यांचे विशेष कौतूक केले जात आहे. स्वाती या एअर इंडिया 777 च्या कमांडर असून, त्यांना 5 वर्षांचे बाळ देखील आहे. इटलीवरून 263 भारतीयांना मायदेशी आणणाऱ्या टीममध्ये स्वाती रावल यांचा देखील समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह यांनी देखील या कामगिरीसाठी पायलट स्वाती रावल आणि राजा चौहान यांचे कौतूक केले.

जेव्हा भारतातील महिला पायलट्सचे नाव येते, त्यामध्ये स्वाती रावल यांचे नाव नक्की असते. त्यांचे नाव मुंबईवरून न्यूयॉर्कला जाणाऱ्या प्लाइटसाठी सर्वाधिक घेतले जाते. त्या मागील 15 वर्षांपासून या सेवेत कार्यरत आहेत.

लहानपणापासून स्वाती यांचे स्वप्न लढाऊ पायलट होण्याचे होते. मात्र त्यावेळी महिलांना हवाई दलात उड्डाण घेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्या फायटर पायलट बनू शकल्या नाहीत.

Leave a Comment