भारतात 1 लाख एन95 मास्क वाटणार ही चीनी कंपनी

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतात 1 लाख एन95 मास्क वाटणार असल्याची घोषणा केली आहे. भारतात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभुमीवर शाओमीने ही घोषणा केली आहे.

शाओमी इंडियाचे मॅनेजिंक डायरेक्टर मनू कुमार जैन यांच्यानुसार, हे सर्व मास्क दिल्ली, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये वाटले जातील. यासोबतच कंपनी एम्स सारख्या संस्थेतील डॉक्टर्सना स्पेशल सूट देखील देणार आहे.

कंपनीने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सरकारचे आदेश पाळत सर्व एमआय होम, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, वेअरहाउस आणि सर्विस सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. सर्व एमआय होमवर डिलिव्हरी ऑन कॉलची सेवा सुरू करण्यात आली असून, याद्वारे शाओमीच्या फोनची डिलिव्हरी केली जाईल.

दरम्यान, शाओमीने 23 मार्चला आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 9एसला मलेशियामध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये 4 रिअर कॅमेरे आणि क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसर मिळेल.

Leave a Comment