घरून काम करताना फॉलो करा या टिप्स, होणार नाही समस्या

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही देखील घरून काम करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही सहज घरून काम करू शकता.

Image Credited – Amarujala

घरी काम करताना कोणते कपडे घालावेत ?

अनेकांना वाटते घरी काम करत असल्याने कोणतेही कपड परिधान करू शकतो. मात्र जर तुम्ही ऑफिसला जातान जे कपडे घालता ते घातले तर तुम्ही मानसिकरित्या घरून काम करण्यास तयार होता. याशिवाय तुम्ही कोणते काम करता, यावरही ते अवलंबून आहे. जर तुम्ही व्हिडीओ कॉल अथवा कॉफ्रेंस करत असाल, तर फॉर्मल कपडे घालणे आवश्यक आहे.

Image Credited – Amarujala

निश्चित कालावधी ठरवणे –

कंपनीत काम करताना तुम्ही ठराविक कालावधीमध्ये काम करत असता. त्यामुळे घरून काम करताना देखील तुम्ही त्या कालावधीचे पालन करावे. ठराविक वेळेतच काम केल्याने काम बाकी देखील राहत नाही व कामाचा दबाव देखील राहत नाही.

Image Credited – Amarujala

बसण्याची योग्य पद्धत –

डॉक्टर नेहमी सल्ला देतात की, काम करताना बसण्याची पद्धत योग्य असणे गरजेचे आहे.  तुमच्या खुर्चीला व्यवस्थित ठेवा, याशिवाय मनगट खाली टेकून की-बोर्डवर काम करू शकाल, असे बसा. व्यवस्थित बसल्याने तुम्ही पाठीचे दुखणे टाळू शकता. ऑफिसमध्ये बसता तसेच, टेबल आणि खुर्ची टाकून बसत असाल तर अधिक चांगले. याशिवाय जेथे गोंधळ नसेल, अशा ठिकाणी काम करण्यास बसावे.

Image Credited – Amarujala

काहीवेळ बाहेर जावे (आयसोलेशनमध्ये नसाल तर) –

वर्क फ्रॉम होम करत असाल, याचा अर्थ दिवसभर घरातच बंद राहू नये. कामातून थोडासा ब्रेक घेऊन, अथवा काम झाल्यानंतर काही वेळासाठी ताजी हवा खाण्यासाठी घरातून बाहेर पडावे. यामुळे मेंदू देखील फ्रेश होईल व थोडा आराम मिळेल.

Image Credited – Amarujala

फोनवर देखील बोलावे –

घरून काम करत असाल, तर तुम्ही घरी ऐकटे असण्याची देखील शक्यता आहे. ऑफिसमध्ये असताना आपण सहकर्मचाऱ्याशी बोलत असतो. मात्र घरी काम करताना कोणाशी बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे थोडा वेळ काढून फोनकरून गप्पा माराव्यात.

Image Credited – Amarujala

ब्रेक घ्या –

घरून काम करताना एक विशिष्ट वेळ, रुटीन निश्चित करणे गरजेचे आहे. मात्र वारंवार तेच केल्याने तुम्ही त्या रुटीनला कंटाळू शकता. वेळो-वेळी ब्रेक घेऊन घरातल्या घरात थोडे फिरावे. दर 25 मिनिटांनी 5 मिनिटांचा ब्रेक घेण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a Comment