कोरोना : भारताने घेतलेल्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक


नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने कोरोना थांबवणे आता तुमच्या हाती असल्याचे म्हणत भारताचे कौतुक केले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. भारताने कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून देशभरातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे.

भारत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले जरी कठोर असली तरी देखील ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने कायम ठेवली पाहिजे, असेही आरोग्य संघटनेने सुचवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचे कौतुक केले आहे.

भारत हा देखील चीनप्रमाणेच बहुसंख्य लोक असलेला देश आहे. कोरोनाचे जे संकट या देशात ओढवले त्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले, असे मायकल जे रेयान यांनी म्हटले आहे. लोकांचे आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी भारताने लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते असल्याचे मायकल जे रेयान म्हणाले.

Leave a Comment