पांढऱ्या कोटातील देवाचे आभार, मुंबईतील 12 कोरोनाग्रस्तांची चाचणी निगेटिव्ह


मुंबई : चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना, महानगरी मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह समोर आली आहे. पण असे असले तरी पुढील चौदा दिवस त्यांना क्वॉरंटाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.

याआधी महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. पुण्यातील दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आल्याचे कालच स्पष्ट झाले होते. त्यात आता मुंबईतील 12 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण पुढील काही दिवस हे सगळे जण निरीक्षणाखालीच राहणार आहेत.

Leave a Comment