संचारबंदीमुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले!


पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी आस्थापने सुरू राहणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. पण सध्या पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातील भाजीपाला विक्रेते संचारबंदीमुळे दिसेनासे झाल्यामुळे पुणेकरांना भाजीपाल्यासाठी वणवण फिरावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जिथे हा भाजीपाला मिळत आहे, तिथे तो चढ्या दराने विकला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

भाज्याचे दर प्रचंड कडाडले असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नसून 10 ते 20 रुपये किलो असलेले टोमॅटो 60 रुपये किलो, बटाटे 50 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, कांदे 100 ते 150 रुपये किलो, फ्लॉवर 100 ते 120 रुपये किलो, मटार 100 रुपये किलो, मिरची 200 रुपये किलो तर कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात, चवळी या सर्वच भाज्या तिप्पट ते चौपट दराने विकल्या जात आहेत. दरम्यान, भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड येथे मात्र झाली असून भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे.

Leave a Comment