एअर इंडिया पायलट स्वाती रावत सोशल मीडियावर व्हायरल


फोटो सौजन्य टाईम्स ऑफ इंडिया
करोनाने आतंक माजाविलेल्या इटलीमध्ये अडकलेल्या २६३ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी घेऊन येणारी एअरइंडियाची पायलट स्वाती रावळ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सर्व थरातून तिच्या या धाडसाचे आणि कर्तव्यपूर्तीचे कौतुक केले जात आहे. अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एअरइंडियाचे हे विशेष विमान इटलीला पाठविले गेले होते त्याची स्वाती रावळ कमांडर होती. स्वाती ७७७ बोईंगची पायलट आहे.

हे विमान भारतात आल्यावर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग आणि इमिग्रेशन केल्यावर त्यांना आयटीबीपी छावला कॅम्प मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. इंडिया टाईम्सने ही बातमी दिल्यावर स्वाती रावळ एकदम चर्चेत आली. ती पायलट आहे आणि एका मुलाची आई आहे. इतकेच नव्हे तर मुंबई न्युयॉर्क थेट फ्लाईट नेणाऱ्या ज्या मोजक्या महिला पायलट आहेत त्यात तिचा समावेश आहे. तिला १५ वर्षे विमान उड्डाणाचा अनुभव आहे.

स्वातीला खरे तर फायटर पायलट म्हणून करियर करायचे होते पण त्यावेळी भारतीय हवाई दलात महिलांना फायटर पायलट म्हणून घेतले जात नव्हते त्यामुळे तिने व्यावसायिक पायलट होण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर खूप कौतुक झाल्यावर स्वाती सांगते, स्वतःसाठी सगळेच जगतात पण माणसाचे जगणे दुसऱ्यासाठी असायला हवे असे मला वाटते, माझ्यावर सोपविलेले काम मी न घाबरता करते आणि यात माझ्या कुटुंबियांचा सपोर्ट महत्वाचा आहे.

Leave a Comment