अरेच्चा ! युवकाने चक्क पाठीवर काढले गर्लफ्रेंडचे पोट्रेट

गर्लफ्रेंड अथवा पत्नीला खूष करण्यासाठी फूल किंवा गिफ्ट देणे सर्वसाधारण गोष्ट आहे. मात्र व्हियतनाम येथील एका युवकाने यापेक्षा पुढील पाऊल टाकले आहे. 22 वर्षीय त्रुओंग वान लॅमने गर्लफ्रेंडविषयी असलेले प्रेम दर्शवण्यासाठी चक्क तिचे पोट्रेटच पाठीवर काढले आहे.

पोट्रेटचा टॅटू काढण्यासाठी त्रुओंगला 24 तास लागले. तीन वेगवेगळ्या सेशनमध्ये त्याने गर्लफ्रेंड लुओंग खा त्रानच्या पोट्रेटचा टॅटू काढला. हा टॅटू बघून लुओंग देखील हैराण झाली. याआधी देखील त्रुओंगने तिचे नाव जन्मतारीख छातीवर गोंदवली होती.

Image Credited – Bhaskar

सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. काहीजण त्याचे कौतूक करत आहेत, तर काहीजण त्याची खिल्ली उडवत आहे. गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर त्याला या कायमस्वरूपी टॅटूचा पश्चाताप होईल, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र त्रुओंगला याबाबत काहीच वाटत नाही.

Leave a Comment