कोरोनाग्रस्तांच्या घराबाहेर लावले ‘घरापासून लांब’ राहण्याचे पोस्टर

कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्याने अनेकांना होम-क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. दिल्लीत देखील कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली असल्याने क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर बोर्ड लावण्यात आलेले आहे.

अमरउजालाने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील 15 दिवस या घरांपासून लांब राहावे. कोणी यांना भेट शकत नाही. हे कोरोना संशयित आहे, असे चेतावणी देणारे बोर्ड क्वारंटाइन असणाऱ्यांच्या घराबाहेर दिल्ली पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने लावले आहेत.

कोरोना संशयिताना काही काळासाठी समाजापासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्लीच्या दिलशाद गार्डन येथील एक कोरोनाग्रस्त महिला 70 लोकांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

अशोक विहारमध्ये देखील बोर्डवर घराच्या मालकाचे नाव लिहिण्यात आलेले आहे. यावर क्वारंटाइनचा कालावधी देखील नमूद आहे. कुटुंबात किती लोक आहेत, याची देखील संख्या लिहिण्यात आलेली आहे.

तज्ञांच्या मते कोरोना बाबत लोकांमध्ये आधीच अफवा पसरलेल्या आहेत. त्यामुळे असे बोर्ड लावल्याने पुढे जाऊन या लोकांना समाजापासून वेगळे करण्यात येऊ नये. सरकारने बोर्ड व्यतिरिक्त जागृक केले पाहिजे की, क्वारंटाइननंतर लोक सुरक्षित आहे, घाबरू नये.

Leave a Comment