जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्यास करावी लागेल कारवाई


मुंबई : काल (रविवार) राज्यात लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. कलम 144 संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. पण असे असतानाही आज मुंबई आणि पुण्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनांचे जनतेने स्वत:हून पालन करावे. मात्र असे न केल्यास नाईलाजास्तव सरकारला जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी त्याचबरोबर कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी धोकादायक असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा विचार आहे. ज्या राज्यापासून अधिक धोका वाटतो, त्या राज्याच्या सीमा देखील बंद करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment