जाणून घ्या लॉक डाउन म्हणजे काय ?

देशातील वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे अनेक राज्यात लॉक डाउनची स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये लॉक डाउन करण्यात आलेले आहे. अनेक शहरांसह देशातील 75 जिल्हे सध्या लॉक डाउन आहेत. लॉक डाउन म्हणजे नक्की काय ? व याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल ? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया.

लॉक डाउन म्हणजे नक्की काय ?

लॉक डाउन शब्दाचा वापर पश्चिमेकडील देशांमध्ये आणीबाणीच्या काळात अनेकदा केला जातो. भारतात नागरिकांना घरात ठेवण्यासाठी कर्फ्यू अथवा कलम 144 सारख्या कायद्याची मदत घेतली आहे. मात्र भारतात लॉक डाउनची परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. याचा सरळ शब्दात अर्थ महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद असेल.

या काळात केवळ आणीबाणीची स्थिती असेल तरच घरातून बाहेर पडण्याची परवानगी असेल. या काळात बाजार, व्यापार, दुकान, सार्वजनिक वाहतूक बंद असेल.

आधी झालेले लॉक डाउन –

अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर तीन दिवसांसाठी पहिल्यांदा लॉक डाउन करण्यात आले होते. त्यानंतर 2013 मध्ये बॉस्टन आणि 2015 मध्ये पॅरिस हल्ल्यानंतर ब्रुसेल्स लॉक डाउन करण्यात आले होते.

कोणत्या सेवा बंद –

कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असेल. याशिवाय खाजगी बस, टॅक्सी, रिक्षा बंद असतील. दिल्लीत डीटीसीच्या 25 टक्के बस चालतील. सर्व दुकान, बाजार, कंपनी, वर्कशॉप, कार्यालय, गोदाम बंद असेल. सर्व विमान सेवा बंद असतील. धार्मिक ठिकाण देखील बंद असतील.

काय सुरू असेल ?

दुध, भाजी, औषधाची दुकाने, हॉस्पिटल, राशन दुकान, बँक, टेलिकॉम, इंटरनेट आणि टपाल सेवा सुरू असेल.

कोणाला मिळणार सुट –

पोलीस कर्मचारी कामाला जाऊ शकतात. तसेच कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे आपल्या कामावर जाऊ शकतात. आरोग्य कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे काम सुरू राहील. कारागृह, वीज आणि पाणी कार्यालय सुरू राहील. महानगरपालिकेतर्फे कचरा उलचण्याचे काम सुरू असेल.

पेट्रोल पंप –

या काळात पेट्रोल पंप आणि एटीएम सुरू असतील. मात्र पेट्रोल पंपासाठी निश्चित वेळ ठरविण्यात आलेली आहे.

खाजगी वाहनांचा वापर –

खूप गरजेचे असेल तर खाजगी वाहनांचा प्रयोग करता येईल. मात्र विनाकारण बाहेर फिरल्यास कारवाई केली जाऊ शकते. मदतीची गरज असल्यास रुग्णवाहिकेला बोलवता येईल.

लग्न-इतर कार्यक्रम –

संसर्ग पसरण्याच्या भितीने कोणत्याही कार्यक्रमासाठी लोकांना बोलवण्यास बंदी आहे. खूपच गरजेचे असल्यास तुम्ही प्रशासनाकडून परवानगी घेऊ शकता.

Leave a Comment