कोरोना : या अ‍ॅप्सद्वारे रहा मित्र-नातेवाईंकाच्या संपर्कात

कोरोना व्हायरसमुळे देशभरातील शहर लॉक डाउन करण्यात आली आहे. त्यामुळे लोक घरात कैद आहेत. अशा परिस्थिती नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना भेटणे शक्य नाही. मात्र या स्थितीतही इंटरनेट आणि मोबाईलच्या मदतीने आपण आपल्या मित्र परिवाराशी नेहमी संपर्कात राहू शकतो. अशाच काही अ‍ॅप्सबाबत जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

व्हॉट्सअ‍ॅप –

कोरोनामुळे घरात बंद असताना तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने मित्र-नातेवाईकांच्या संपर्कात राहू शकता. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुम्ही मेसेजिंगपासून ते ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग देखील करू शकता. या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही ऑफिसचे देखील काम करू शकता.

Image Credited – Amarujala

फेसबुक मेसेंजर –

फेसबुक मेसेंजरद्वारे तुम्ही मित्र-नातेवाईंकाशी मनसोक्त बोलू शकता. याद्वारे तुम्ही मेसेजिंगपासून ते ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग देखील करू शकता.

Image Credited – Amarujala

इंस्टाग्राम –

इंस्टाग्रामचा वापर लोक फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगसाठी करत असतात. मात्र याद्वारे देखील तुम्ही मित्रांशी चॅट करू शकता व व्हिडीओ कॉलिंगद्वारे मित्र-नातेवाईंकाशी बोलू शकता.

Image Credited – Business Insider

स्काईप –

हे अ‍ॅप स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉपवर सहज वापरू शकता. याद्वारे मित्रांना व्हिडीओ कॉल, वॉइस कॉल आणि मेसेज करून त्यांच्याशी संपर्कात राहू शकता. सोबतच ऑफिसच्या मिटिंग आणि काँफ्रेस देखील करू शकता.

Leave a Comment