घरी बसल्या बसल्या असे जाणून घ्या कोरोनाचा संसर्ग आहे की नाही ?

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्य लॉक डाउन करण्यात आली असून, कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांच्या मनात या व्हायरसबाबत भिती आहे, मात्र लोकांनी घराच्या बाहेर न पडता स्वतःची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

कशाप्रकारची समस्या असल्यास नागरिक 1075 या क्रमांकावर कॉल करू शकतात. याशिवाय घरी बसून देखील लक्षण सांगून कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे की नाही हे तपासू शकता.

Image Credited – Amarujala

अपोलो हॉस्पिटलने या संदर्भात एक वेबसाईट लाँच केली आहे. याचे यूआरएल https://covid.apollo247.com/ आहे. या वेबसाईटवर तुम्हाला नाव, लिंग व शरीराचे तापमान विचारले जाईल.

Image Credited – Amarujala

हे सर्व विचारल्यानंतर खोकला, कफ, घशाचा त्रास व अन्य लक्षणांबाबत माहिती विचारली जाईल. तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारावर तुमची स्थिती नॉर्मल, मध्यम अथवा गंभीर आहे, हे सांगण्यात येईल.

Image Credited – Amarujala

याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा देखील पर्याय मिळेल. वेबसाईटवरून तुम्ही कोरोनाचे लक्षण आणि माहिती जाणून घेऊ शकता व भ्रम दूर करू शकता.

Leave a Comment