विमानात कोरोनाग्रस्त असल्याने पालयटने केले हे कृत्य

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थिती कोरोनाचे नाव जरी काढले तरी लोक एकदम सतर्क होत आहेत. अशा स्थितीत मागील शुक्रवारी एअर एशिया इंडियाच्या पुणे-दिल्ली प्लाइटमध्ये कोरोना संशयित व्यक्ती प्रवास करत असल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला.

ही माहिती मिळताच विमानातील इतर प्रवासी आणि क्रू मेंबर्स देखील घाबरले. एवढेच नाही तर लँडिंगनंतर पायलट इन कमांडने चक्क कॉकपिटच्या स्लाईड खिडकीमधून उडी मारत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

20 मार्चला ही घटना पुण्यावरून दिल्लीला येणाऱ्या एअर एशिया इंडियाच्या I5-732 विमानात घडली. यानंतर प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले.

पहिल्या रांगेत बसलेल्या कोरोना संशयित रुग्णामुळे अचानक विमानात गोंधळ उडाला व भितीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा म्हणून सर्व प्रवाशांना मागून उतरवण्यात आले. यानंतर विमानाला स्वच्छ व सॅनिटाइज करण्यात आले.

Leave a Comment