मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी; तर कोरोना बाधितांचा आकडा 89 वर


मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढतच असून त्यातच आता महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. या कोरोना बाधिताचा मुंबईतील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.

15 ने महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.

Leave a Comment