देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे सेवा बंद

कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असल्याने सरकारने रेल्वे सेवा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे. 1853 सालापासून देशात रेल्वे सेवा अखंडीत सुरू आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही सेवा पहिल्यांदाच बंद करण्यात आली आहे.

या निमित्ताने 1974 सालच्या रेल्वे संपाची आठवण होत आहे. मात्र अशी परिस्थिती 1974 साली माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी केलेल्या अखिल भारतीय रेल्वे संपाच्या वेळेस देखील नव्हती. यावेळी रेल्वे संपादरम्यान 8 मे 1974 ते 15 मे 1974 पर्यंत संपुर्ण चक्काजाम होते. हा संप 22 दिवस सुरू होता. काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 तर कुठे 15 दिवस संप सुरू होता.

15 मे 1974 पर्यंत संपुर्ण भारत भरात रेल्वे चक्काजाम असला तरी, अनेक ठिकाणी रेल्वे सुरू होती. काही ठिकाणी सरकारने रेल्वे ट्रॅकवर केवळ इंजिन चालवले. रेल्वेत प्रवाशांच्या जागी सैन्याचे जवान होते.

उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब येते हा संप यशस्वी ठरला होता. अखेर 28 मे 1974 ला ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनने हा संप मागे घेतला होता. मात्र यंदाची परिस्थिती पुर्णपणे भिन्न असून, कोरोना व्हायरसाचा प्रसार रोखण्यासाठी मालगाड्या व्यतिरिक्त सर्व पेसेंजर रेल्वे 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

याशिवाय प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तिकीट रद्द केल्याचे पैसे प्रवाशांना 21 जूनपर्यंत मिळतील. याशिवाय प्रवास 139 क्रमांकावर फोनकरून तिकीट रद्द करू शकतो.

Leave a Comment