कोरोनाच्या भितीने हजारो परप्रांतियांची घरवापसी

दिल्ली, मुंबई आणि पुण्यात कोरोना व्हायरसमुळे कारखाने, कंपनी बंद करण्यात आले आहेत. खाजगी कंपन्या बंद झाल्याने कर्मचारी घरात बसून आहेत. तर परप्रांतीय आपआपल्या घरी परतत आहेत. रविवारी या ठिकाणांवरून 19,600 उत्तर प्रदेशला पोहचले आहेत. हे सर्व प्रवासी रेल्वेने उत्तर प्रदेशला पोहचले. प्रशासनाने विशेष बसची सोय करून त्यांना स्टेशनवरून निर्धारित ठिकाणी पोहचवले.

मुंबई, पुणे आणि दिल्लीवरून दोन डझनपेक्षा अधिक रेल्वे काल उत्तर प्रदेशला पोहचल्या. यातील 19,600 प्रवासी लखनऊ, गोरखपूर, झांसी, वाराणसी, कानपूर, प्रयागराज आणि देवीपाटण येथील स्टेशनवर उतरले. मात्र जनता कर्फ्यू असल्याने प्रवाशांना स्टेशनवरून घरी जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. अखेर संसर्गाच्या भितीने प्रशासनाने प्रवाशांसाठी विशेष बसची सोय केली.

पुष्पक एक्सप्रेस, सीएसटीएम-एलजेएन, एलटीटी-एलजेएन, पुणे-एलजेएन, बीडीटीएस-एलजेएन वरून, कामायनी, महानगरी, पवन, पुणे एक्सप्रेसने वाराणसी, पंजाब मेल, झेलमवरून झांसी, कुशीनगर, दादरवरून प्रवासी गोरखपुरला पोहचले.

सरकारी आकड्यांनुसार, लखनऊमध्ये 7000, गोरखपुरमध्ये 3500, झांसीमध्ये 1100, वाराणसीमध्ये 4000, कानपूरमध्ये1100, प्रयागराजमध्ये 1800 व देवीपाटनमध्ये 1100 प्रवासी पोहचले. या प्रवाशांसाठी 348 बसची सोय करण्यात आली होती.

Leave a Comment