शास्त्रज्ञांनी शोधली कोरोनाची नवी लक्षणे, या तीन लक्षणांमुळे समजणार कोरोना


वुहान : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. चीनच्या वुहानमधून आलेला हा व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. या व्हायरसने भारतातही वेगाने शिरकाव केला आहे. भारतात रुग्णांची संख्या 300हून अधिक झाली आहे. यातच शास्त्रज्ञांना कोरोनाची नवी लक्षणे सापडल्यामुळे 14 दिवसांत समजणारा कोरोना आता 5 दिवसांत समजत आहे.

या प्राणघातक व्हायरसची संपूर्ण जगात लागण झालेल्या लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, कोरोनाची लक्षणे समजण्यासाठी आता 5 दिवसांचा कालावधी पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शरीरार ही 3 लक्षणे दिसल्यानंतर कोरोना विषाणूचा धोका लवकर समजू शकतो.

इंटर्नल मेडिसीनच्या जर्नलच्या अहवालानुसार, पहिल्या पाच दिवसात कोरोनाची तीन विशिष्ट लक्षणे आढळतात. यात अमेरिकन संशोधकांनी प्रसिद्ध केलेला हा अहवाल सांगतो की कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसांत एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला येणे सुरू होतो. हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे.

त्यानंतर रुग्णाला जास्त ताप येऊ लागतो आणि त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढते. आतापर्यंत अनेक आरोग्य तज्ञांनी कोरोना विषाणूचा उच्च ताप असल्याचा दावा केला आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीला पहिल्या 5 दिवसात श्वास घेण्यासाठीही त्रास होतो. एका अहवालात असा दावा केला गेला आहे की फुफ्फुसात श्लेष्मा पसरण्यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवतात.

तर, कोरोनामध्ये समान लक्षणे असल्याचा दावा राष्ट्रीय आरोग्य केंद्र (NHS) आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही केला. यामध्ये शरीरावर वेदना, सर्दी यासारख्या समस्याही सांगितल्या गेल्या. हे संशोधन चीनमधील वुहान शहरातील सुमारे 50 संशोधकांनी केले आहे. यावेळी, आरोग्य तज्ञांनी देखील 14 दिवस लोकांना अलिप्त राहण्याचा सल्ला दिला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की कोरोना विषाणूसारखी लक्षणे ही सामान्य सर्दी, फ्लू, संसर्ग किंवा न्यूमोनियासारखेच असतात.

Leave a Comment