कोरोना : 31 मार्चपर्यंत रेल्वे, मेट्रो आणि आंतरराज्यीय बस सेवा बंद

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व रेल्वे सेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 वर पोहचला आहे. याशिवाय व्हायरसपासून बचावासाठी देशभरातील नागरिक 22 मार्चला 14 तासांसाठी जनता कर्फ्यू देखील पाळताना दिसत आहेत.

रेल्वे बोर्डाने देशभरातील सर्व पॅसेंजर रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मालगाड्या सुरू असतील. सबर्न ट्रेन्स आणि कोलकत्ता मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतील.

सरकारने सर्व राज्यांना गर्दी टाळण्यासाठी शैक्षणिक संस्था, जिम, म्यूझियम, सांस्कृतिक ठिकाणे, स्विमिंग पूल्स आणि थेअटर 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे देखील आदेश दिले आहेत. अनेक राज्यांनी बस सेवा देखील बंद केल्या आहेत.

दिल्लीत आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच उद्यापासून मेट्रो सेवा देखील मोठ्या प्रमाणात बंद ठेवण्यात येतील. पंजाब आणि राजस्थान यांनी देखील 31 मार्चपर्यंत संपुर्ण राज्यातील सर्वच सेवा बंद केल्या आहेत.

गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि वडोदरा ही चार शहर बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आली आहे. केवळ फळ-पालेभाज्या विक्रेते, डेअरी प्रोडक्ट्स आणि मेडिकल दुकाने सुरू असतील.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण सेवा देखील 1 आठवड्यासाठी बंद करण्यात आल्या असून, अनेक एअरलाईन्सने आपल्या प्लाईट्सची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  देशभरातील प्रसिद्ध ठिकाण असलेली तिरूमाला मंदिर आणि ताज महाल देखील गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आली आहेत.

Leave a Comment