जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ हे हॅशटॅग वापरून करू शकता ट्विट

जगभरात वेगाने वाढणारा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.  पंतप्रधान म्हणाले की, हा कर्फ्यू कोरोनाच्या विरोधात सर्वात मोठे हत्यार असेल. हा एकप्रकारे जनतेसाठी, जनतेद्वारे स्वतःवर कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करायचा असेल, तर घरातच राहणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की, आजूबाजूच्या लोकांना व्हायरसप्रती जागृक करणे व आवश्यकता नसेल तर घरात राहावे.

तुम्ही देखील या व्हायरसशी लढण्यासाठी घरात थांबून लढा देऊ शकता. याशिवाय जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ तुम्ही #JantaCurfewMarch22, #CoronaChainScare, #StayHomeStaySafe, #IndiaFightsCorona वापरून ट्विट करू शकता.

मोदींनी सांगितले की, सर्वांनी केंद्र व राज्य सरकारच्या दिशा निर्देशांचे पालन करावे. 22 मार्चला सर्वांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे देखील नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच सायंकाळी 5 वाजता टाळी, ताट वाजवून आपल्यासाठी सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानावे.

Leave a Comment