कोरोना : मोदींच्या ‘टाळी-थाळी’ आवाहनाचे हे आहे महत्त्व

देशात कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढत चालला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला देशभरात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन मोदींनी केले आहे.

याशिवाय पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सायंकाळी 5 वाजता घराच्या बाहेर येऊन 5 मिनिटे डॉक्टर, पोलीस, होम डिलिव्हरी करणाऱ्या लोकांचे आभार मानावे असे सांगितले आहे. लोक आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवून, ताट वाजवून अथवा घंटी-शंख वाजवून आभार प्रकट करू शकतात.

काही लोकांना आभार व्यक्त करण्याची ही पद्धत एक नाटक वाटत आहे, तर काही जणांच्या मते यामागे वैज्ञानिक कारण आहे, ज्याचा उल्लेख आयुर्वेदात देखील आढळतो. याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – medium

योगात टाळी वाजवण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. टाळी वाजवल्याने हाताच्या एक्यूप्रेशर प्वॉइंटवर दबाव पडतो व याचा आपल्या ह्रदय आणि फुफ्फुसांवर चांगला परिणाम होतो. प्रेशर प्वॉइंटवर दबाव आल्याने त्याच्याशी जोडलेल्या अंगापर्यंत रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो.

Image Credited – GOQii

याशिवाय शंख वाजविण्याविषयी सांगितले जाते की वातावरणात ध्वनी पैदा केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक शक्तीमध्ये स्फुर्ती येते व आजुबाजूचे वातावण चांगले होते. आयुर्वेदमध्ये घंटीच्या आवाजाचा संबंध मस्तिष्कशी जोडण्यात आलेला आहे. घंटीमुळे मानवाच्या मेंदुमध्ये एकाग्रता निर्माण होते.

Image credited – Amarujala

ध्वनी निर्माण केल्याने खगोलीय उर्जेचे उत्सर्जन होते. हे अशुद्ध गोष्टींना नष्ट करून मानवात उर्जेचा संचार करते. शंख वाजवल्याने अंतरिक व बाहेरील दोन्ही वातावरण प्रभावित होतात. तसेच शंखाच्या आवाजाने कीटाणू देखील नष्ट होतात, असे अनेक अभ्यासात समोर आले आहे.

Leave a Comment