वैज्ञानिकांचा दावा – तांब्यावर वेगाने नष्ट होतो कोरोना

कोरोना व्हायरसला स्टीलच्या पृष्ठभागावर नष्ट होण्यासाठी 72 तास, तर प्लास्टिकच्या पृष्ठभागावर नष्ट होण्यासाठी 96 तास लागतात. मात्र नवीन कोरोना व्हायरस तांब्याच्या पृष्ठभागावर अवघ्या 4 तासात नष्ट होतो, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी 5 प्रकारच्या परिस्थितीममध्ये व्हायरस जिंवत राहण्याविषयी संशोधन केले. वैज्ञानिकांनुसार, हवेतील कणांमध्ये व्हायरस 3 तासात नष्ट होतो व कार्डबोर्डवर 24 तासात नष्ट होतो.

हा दावा नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शियस डिजीज हॅमिल्टन, प्रिंस्टन यूनिवर्सिटी, कॅलिफोर्निया यूनिटवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनमध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये केला आहे.

वैज्ञानिकांनुसार, कोरोना व्हायरस हवेतील धुके, धुळ आणि वाफेतील कणांमध्ये 3 तासांपर्यंत जिंवत व संसर्ग करण्यायोग्य असतो. हवेद्वारे देखील व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असल्याने हवेने याचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे.

व्हायरस अनेक तास जिंवत राहत असला तरी, याची मात्रा कमी होत चालली आहे. या पृष्ठभागांना साबण, डिटर्जेंट आणि डिसइंफेक्टेंटद्वारे स्वच्छ करून संसर्ग रोखता येतो.

गरमीमुळे व्हायरस नष्ट होऊ शकतो की नाही, या संदर्भात संशोधन झालेले नाही. सध्या केवळ 21 ते 23 डिग्री सेल्सियस तापमानात संशोधन झालेले आहे. त्यामुळे काही वैज्ञानिकांनुसार, वातावरण ऊन असल्यास व्हायरस वेगाने नष्ट होऊ शकतो.

Leave a Comment