कोरोनामुळे वाढली नात्यातील जवळीकता

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे देशभरातील अनेक शहर लॉकडाउन झाली असल्याने लोक घरात कैद झाले आहेत. तर काहीजण घरून काम करत आहेत. लोक घरातून बाहेर पडत नसल्याने आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवत आहेत. यामुळे नात्यामधील अंतर देखील कमी होत असून, लोकांची दिनचर्या देखील बदलली आहे.

लोक एकमेंकासोबत वेळ घालवत असून, यामुळे जवळीकता वाढली आहे. तसेच लांब राहणाऱ्या नातेवाईकांना देखील वारंवार कॉलकरून त्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत. ज्या नातेवाईकांसोबत वर्षांनुवर्ष बोलणे होत नाही, त्यांच्यासोबत कोरोनामुळे बोलणे होत आहे.

लोक घरात बसून आपल्या कुटुंबासोबत चित्रपट, कार्यक्रम पाहत वेळ घालवत आहेत. कोरोनामुळे व्यवसाय देखील ठप्प झाल्याने लोक घरातच आहेत.

याशिवाय नागरिकांनी सांगितले की, यामुळे स्वच्छतेची देखील चांगली सवय लागली आहे. बाहेरून घरात येण्यापुर्वी हात सेनेटाइज करूनच आत येतात. सोबतच हात वारंवार धुण्याची देखील सवय लागली आहे.

Leave a Comment