24 भारतीयांनी केली कोरोनावर यशस्वी मात


मुंबई : भारतात कोरोनाचे आतापर्यंत 325 रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 74वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कोरोनावर देशातील 24 जणांनी यशस्वीपणे मात केली आहे. हे 24 जण नीट उपचार घेऊन पुन्हा बरे झाले आहेत. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर आज भारतात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Comment