अमळनेरमधील दांपत्याविरुद्ध परदेश दौऱ्याची माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल


जळगाव – कोरोना व्हायरसची जग, देश आणि महाराष्ट्रासह सर्वत्र भीती पसरली असून कोरोना व्हायरसचे भारतातील बहुतांश रुग्ण परदेश दौऱ्यावरून आलेल्यांपैकीच असल्यामुळे, प्रशासनाकडून वारंवार परदेश दौऱ्यांची माहिती लपवू नका असे आवाहन केले जात आहे. जळगावातील एका दांपत्याला याच निर्देशांचे पालन नाही करणे महागात पडले आहे. परदेश दौरा करून त्याची माहिती लपविणाऱ्या एका दांपत्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमळनेर पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक दांपत्य थायलंडला फिरण्यासाठी गेले होते. परंतु, देशात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील माहिती कुणालाही दिली नाही.

शनिवारी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे विलगीकरण बंधनकारक आहे. त्यांच्यामुळे इतरांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते. परदेशातून आल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही याचा वेगळे राहण्याशी काहीच संबंध नाही. त्यांनी काळजी म्हणून इतरांशी संपर्क टाळावा आणि आपल्या दौऱ्याची माहिती प्रशासनाला द्यावी. जळगाव जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या एका टीमने शुक्रवारी एका दांपत्याला शोधून काढले. या दांपत्याने थायलंडच्या बँकॉक आणि पट्टायाचा दौरा केला होता. परंतु, प्रशासनाला परतल्यानंतर काहीच माहिती दिली नाही.

Leave a Comment