राज्यातील 5 रुग्णांची कोरोनावर मात


मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात वाढत असताना महाराष्ट्र सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना महाराष्ट्रामध्ये बरा होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे 5 रग्ण बरे होत असून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात येणार असले तरी त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर उपाय होत आहे ही बाब अत्यंत सकारात्मक आहे.

याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण मुंबई, पिंपरी आणि पुण्यात आढळले असल्यामुळे आता महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे. तर यामुळे घाबरून न जाता काळजी घ्या, शक्य तितक्या वेळ घरी रागण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्यदायी रहा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला दिले आहे.

Leave a Comment