करोनामुळे चाळीस बड्या क्रीडा स्पर्धांवर संक्रांत


फोटो सौजन्य इकोनॉमिक टाईम्स
जगभरात हातपाय पसरलेल्या करोना मुळे क्रीडा क्षेत्रातील किमान ४० बड्या स्पर्धा रद्द करण्याची अथवा पुढे ढकलण्याची पाळी आली आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजकांना मोठा फटाका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धात क्रिकेटच्या आणि बॅडमिंटनच्या प्रत्येकी आठ स्पर्धा आहेत.

यात भारत, द,आफ्रिका दोन वनडेचा समावेश असून आयपीएल सध्या १५ एप्रिल पर्यंत पुढे ढकलल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड २ वनडे, पाक सुपर लीग, इंग्लंड श्रीलंका सिरीज आणि नेपाळ टी २० रद्द झाल्या आहेत. तर आयर्लंड, झिंबाब्वे सिरीज स्थगित केल्या गेल्या आहेत. टेनिस मध्येही ऑस्ट्रलिया इंटरनॅशनल असोसिएशन टूर्नामेंट, बीएनपी परीभास ओपन, मियामी ओपन, मोंटेकार्लो मास्टर्स, फ्रेंच ओपन यांचा समावेश आहे.

बॅडमिंटन मध्ये चायना मास्टर्स, एशियन, जर्मन ओपन, इंडिया ओपन, स्वीस ओपन, मलेशिया, सिंगापूर रद्द झाल्या आहेत. हॉकी आणि फुटबॉलला ही करोनाचा फटाका बसला आहे. फुटबॉल युरो २०२० स्पर्धा पुढे ढकलली गेली आहे तसेच कोपा अमेरिका २०२१ मध्ये घेतली जाणार आहे. बास्केट बॉल, बॉक्सिंग, शुटींगच्याही स्पर्धा रद्द केल्या गेल्या आहेत.

Leave a Comment